नाशिकच्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेपूर्वी शिवसेनेला धक्का, शिंदे म्हणतात…

ठाकरे गटाला या सभेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत महिला आघाडीने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

नाशिक- आज मालेगामध्ये ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. या सभेचा दोन दिवसांपूर्वी टिझर लॉँन्च करण्यात आला होता, या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच दोनच गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी जोरदार टिका उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली होती, त्याला उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना, आता ठाकरे गटाला या सभेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत महिला आघाडीने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

विरोधकांनी धसका घेतलाय – राऊत

नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी खोटे आरोप करु नयेत. अन्यथा उत्तर सभा घेण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी मालेगावमधील सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचं म्हटलं आहे. सभेचा काही लोकांनी धसका घेतला आहे. त्यामुळ उद्धव ठाकरेंच्याविरोधात अपप्रचार करण्यात येत आहे. तुम्ही कितीही अपप्रचार करा. सर्व जाती धर्माचे लोक या सभेला येणार आहेत. हा लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याने काही होणार नाही. माझ्या भाषेत सांगायचं तर मालेगावच्या सभेने या लोकांची हातभर फाटलीय, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

१५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश

आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, त्यामुळे हे आपलं सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) उपस्थित होते. नाशिकमध्ये ठाण्याप्रमाणे संघटना बांधण्याचे काम केले जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. पण मालेगाव सभेपूर्वी ठाकरे गटातील महिलांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं ठाकरे गटाला हा धक्का मानला जात आहे.