खबरदार! पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केल्यास होणार पाच पट दंड, पाणीटंचाईची स्थायीच्या सभेत नगरसेवकांची तक्रार (फोटो सौजन्य-Gemini)
गेल्या आठवड्यात दोन दिवस संपुर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याचे पडसाद गुरूवारी स्थायी समितीच्या सभेत उमटले. शनिवार, रविवार अधिकृत पाणी पुरवठा बंद ठेवला असला तरी, आज चार, पाच दिवस उलटूनही पाणी पुरवठा सुरूळीत झालेला नाही. काही ठिकाणी गढूळ तर काही ठिकाणी अपुरा पाणी पुरवठा होत असून, नळांना पाणीच येत नसल्याची तकार भारती ताजनपुरे, आदिती पांडे, राहूल दिवे, दिपाली कुलकर्णी, माधुरी बोलकर आदींनी केली. महासभेत महापौरांनी प्रत्येक प्रभागासाठी पाण्याचे टँकर देण्याच्या सुचना करूनही पाणी पुरवठा विभागाकडून त्याची पुर्तता केली जात नाही. त्यामुळे टँकरची मागणी करूनही दोन दोन दिवस टैंकर उपलब्ध होत नसल्याने टँकरची संख्या वाढवावी व प्रत्येक प्रभागासाठी एक टँकर देण्यात यावी अशी सुचनाही यावेळी करण्यात आली. सदस्यांच्या या भावनेशी सभापती सानप यांनीही सहमती दर्शवित, आपल्या प्रभागातील दोनशे ते तीनशे महिला पाण्यासाठी घरी आल्याचे सांगितले.
“हा तर ‘कॉर्पोरेट जिहाद’…”; IT कंपन्यांतील महिलांच्या लैंगिक शोषणावरून नितेश राणे संतापले; म्हणाले…
शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्यासाठी सध्या सुरू असलेले कामे देखील कारणीभूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले, पंचवटीत दोन ठिकाणी, नाशिकरोड व वडाळा येथेही पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. रस्त्यांवर कामे करतांना संबंधित ठेकेदाराकडून अगोदर मेटल डिटेक्टरने तपासणी करावयास हवी परंतु तसे होत नसल्याने थेट खोदकामामुळे पाईपलाईन फुटत असल्याचे सांगून त्याची जबाबदारी अप्रत्यक्ष बांधकाम विभागावर ढकलण्याचा प्रयत्न झाला. त्यावर पाईपलाईन तोडणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली.
प्रभागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने संबंधित अधिका-यांचे दूरध्वनी क्रमांक दिले असले तरी, संबंधित अधिकारी एकतर फोन घेत नाही, किंवा फोन बंद करून ठेवतात. अशा वेळी नागरिकांना आम्ही काय उत्तर द्यावे असा सवालही सदस्यांनी केला. त्यावर अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर यांनी, अधिकाऱ्यांना खूप फोन येत असल्यामुळे बॅटरी संपली असावी असे उत्तर देवून वेळ मारून नेली.
शहरातील पाणी प्रश्नावर संबंधित विभागीय अधिकारी, उपअभियंत्यांची स्वतंत्र बैठक आयुक्तांच्या उपस्थितीत घेण्यात येईल.
टँकरची संख्या वाढवून प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टँकर देण्यात यावे. पाणी पुरवठ्याच्या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या बदल्या करण्यात येतील. रस्त्यावर कामे करतांना ठेकेदारांनी अगोदर तपासणी करावी, मगच कामाला सुरवात करावी.






