Shalini Thackeray criticizes Shiv Sena

यूपीतील सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी मागील ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले होते. त्यामुळं जे यूपीत झाले ते महाराष्ट्रात केव्हापासून होणार, असा मनसेकडून सवाल करण्यात आला असून शिवसेनेवर टिका करण्यात आली आहे.

    मुंबई : सध्या राज्याच्या राजकारण हिंदुत्वाचा मुद्धा गाजत आहे, भोंगे, अजान, मशिदी, हनुमान चालीस, आरती आदीवरुन राजकारणी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. दरम्यान, आता मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्द्यावरुन शिवसेनेवर जहरी बाण सोडण्यात आले आहेत. यूपीतील सर्व मदरशांमध्ये दररोज राष्ट्रगीताचे गायन अनिवार्य करण्यात आले आहे. मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस. एन. पांडे यांनी मागील ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी केले होते. त्यामुळं जे यूपीत झाले ते महाराष्ट्रात केव्हापासून होणार, असा मनसेकडून सवाल करण्यात आला असून शिवसेनेवर टिका करण्यात आली आहे.

    दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्दावरून आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एक टिव्ट करत शिवसेना व मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. “यूपीमध्ये अजान, रस्त्यावरील नमाज आणि आता मदरशात राष्ट्रगीत पण. महाराष्ट्रातील महाभकास आघाडीला भोंगे उतरवायला कायदा लागतो आणि आता मदरशात राष्ट्रगीत सक्तिसाठी पण कायदा लागणार का..? हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडाने नुसतेच बोलणार की कृती पण करणार. आ देखे जरा किसमें कितना है दम,” असं टिव्ट करकत शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं याला आता शिवसेकडून कोणते उत्तर येते हे पाहावे लागेल.