९ ऑगस्ट क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक

मंगळवार ९ ऑगस्ट क्रांतीदिनी (9 August krantidini) सकाळी ९ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ग्रॅन्ड रोड नानाचौक (Grant road, nana chowk) येथून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जाणार आहे. (silent procession of mill workers) तिथे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने हुतात्मा स्मारकाला अध्यक्ष आमदार सचिन अहिर (sachin ahir), सरचिटणीस गोविंदराव मोहिते (Govind mohite) पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील.

    मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर (National Mill Workers) संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे येत्या मंगळवार ९ ऑगस्ट क्रांतीदिनी (9 August krantidini) सकाळी ९ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ग्रॅन्ड रोड नानाचौक (Grant road, nana chowk) येथून गिरणी कामगारांची मूक मिरवणूक ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जाणार आहे. (silent procession of mill workers) तिथे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने हुतात्मा स्मारकाला अध्यक्ष आमदार सचिन अहिर (sachin ahir), सरचिटणीस गोविंदराव मोहिते (Govind mohite) पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील.

    दरम्यान, मूक मिरवणूकीच्या आधी सुरुवातीला अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते तसेच खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी मूक मिरवणूकीचे नेतृत्व करतील. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने पन्नास वर्षांपूर्वी पासून ही प्रथा सुरू आहे. त्यामुळं ९ ऑगस्ट क्रांतीदिनी गिरणी कामगार मूक मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणूकीला गिरणी कामगारांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे.