मनपाच्या विविध प्रभागात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात संपन्न!

कर्मचारी यांस राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, शपथ देऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिन गुरूवारी उत्साहात संपन्न झाला. निवडणूक प्रक्रियेतील नागरीकांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून जनजागृती होण्यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांस राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, शपथ देऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले.

    राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य लेखा परिक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत, महापालिका सचिव तथा उपायुक्त वंदना गुळवे, उपआयुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, स्वाती देशपांडे, अवधुत तावडे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, योगेंद्र राठोड, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी देखील मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.

    त्याचप्रमाणे महापालिकेच्या इतर विभागात तसेच सर्व प्रभागातही संबंधित सहा.आयुक्त यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेतली.