ajit pawar
संग्रहित फोटो

दौंड मध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्याला   राहू  येथील  भर चौकात  जमावा कडून  कारखान्याच्या सभेत कारखाना अध्यक्ष यांचे विरोधात भाषण केले म्हणून जबरदस्त मारहाण करण्यात आली.सदर झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवण्यास आलेल्या कार्यकर्त्याला पोलिसांनी तीन तास बसवून ठेवत शेवटी तक्रार दाखल  करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला.

    यवत  : दौंड मध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्याला   राहू  येथील  भर चौकात  जमावा कडून  कारखान्याच्या सभेत कारखाना अध्यक्ष यांचे विरोधात भाषण केले म्हणून जबरदस्त मारहाण करण्यात आली.सदर झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवण्यास आलेल्या कार्यकर्त्याला पोलिसांनी तीन तास बसवून ठेवत शेवटी तक्रार दाखल  करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला.
    भीमा साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण  सभेत राहू येथील राष्ट्रवादीचे कर्यकर्ते शांताराम बांदल यांनी कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचे विरोधात भाषण केले. याचा राग धरून  कुल यांच्या भावकीतील  तरुणांनी शांताराम बांदल यांना राहू येथील चौकात  जबरदस्त  ठोकले.  बांदल हे पोलीस चौकीत तक्रार देण्यास आले असता तीन तास बसवून ठेवत तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला, असे बांदल  यांचे सांगणे आहे.याबाबत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना विचारले असता, बांदल यांनी व्हाट्स अप ग्रुपवर  आक्षेपार्ह  मजकूर टाकल्याने बांदल यास मारहाण करण्यात आली आहे . बांदल यांची   तक्रार दाखल का करून घेतली नाही. हे मात्र सांगण्याचे टाळले.
    वास्तविक बांदल यांची तक्रार दाखल करून घेणे रास्त होते. बांदल यांनी  व्हाट्स अप ग्रुपवर बदनामी कारक लिखाण केले होते, याबाबत बांदल यांचे विरोधात ही तक्रार दाखल करून घेणे रास्त होते.असे न करता बांदल यांची तक्रार घेण्यास टाळल्याने अजितदादा पवार गटात प्रचंड नाराजी पसरली आहे. दौंड मध्ये भाजपा कार्यकर्ते राष्ट्रवादी  कार्यकर्ताची  मुस्कटदाबी  करीत  असल्याचे चित्र समोर आले आहे.बांदल हे तक्रार देण्यास यवतला आले असता त्यांचे मागे पाठलाग करीत भाजपचे बरेच कार्यकर्ते यवत पोलीस ठाण्यात आले होते. यवत यवत येथे बांदल यास कोण भेटते, काय बोलले यांची टेहळणी केली जात होती अशी चर्चा आहे.
    दौंड मध्ये भाजपा  राष्ट्रवादीची मुस्कटदाबी सातत्याने करीत आहे.  माजी आमदार रमेश थोरात हे स्वतःला अजित पवार यांचे उजवे हात समजतात. परंतु राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भाजपा कडून तालुक्यात अन्याय झाल्यास कार्यकर्ते यांना पाठबळ देण्यास कमी पडतात. अशी खंत नाव न छापण्याच्या अटीवर अनेक  कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
    सदर प्रकार गंभीर असून यामुळे कार्यकर्ते खच्ची  होतील. यासाठी सदर घटना  अजितदादा पवार यांना भेटून   सांगणार असल्याचे बांदल  यानी सूचित केले आहे.