राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा मार्ग अहिंसेचा व विकासाचा : महेश तपासे

आंबेकर यांच्यावर कोणी हल्ला केला हे पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा या तत्वांवर चालणारी पार्टी आहे असंही ते म्हणाले.

    मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि ती लोकं राष्ट्रवादीशी संबंधित आहेत असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केलेला आहे. आंबेकर यांच्यावर कोणी हल्ला केला हे पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.

    दरम्यान अनेक वेळा भारतीय जनता पार्टीची ट्रोल आर्मी समाज माध्यमांवर पवार कुटुंबातील व्यक्तीच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरील शब्दांचा प्रयोग करून पोस्ट निर्माण करत असतात. या सर्व गोष्टीचा मुकाबला संयमाने आम्ही करतो. विचारांची लढाई ही विचारांनीच केली पाहिजे ही शिकवण खुद्द पवार साहेबांची आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसा या तत्वांवर चालणारी पार्टी असून अशा प्रकारच्या हल्ला हा राष्ट्रवादीच्या माथी मारायचा हा राजकीय षडयंत्र आहे का? अशी शंका निर्माण होते. असंही तपासे म्हणाले.