पुणे पोलिसांचे देशभरात छापे; ३ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले, मास्टरमाईंड परदेशी..!

पुणे पोलिसांनी ऐतिहासिक कारवाई केली. दिल्लीसह देशभरात छापेमारी केली. यामध्ये परदेशात वितरित (एक्स्पोर्ट) होणारे 1000 किलो MD दिल्लीत पकडले. पोलिसांनी आतापर्यंत पुणे, कुरकुंभ आणि दिल्ली अशा ठिकाणावरून 3 हजार कोटींचे एमडी पकडले.

  पुणे : पुणे पोलिसांनी ऐतिहासिक कारवाई केली. दिल्लीसह देशभरात छापेमारी केली. यामध्ये परदेशात वितरित (एक्स्पोर्ट) होणारे 1000 किलो MD दिल्लीत पकडले. पोलिसांनी आतापर्यंत पुणे, कुरकुंभ आणि दिल्ली अशा ठिकाणावरून 3 हजार कोटींचे एमडी पकडले.

  दिल्लीत दोन कारवाईत 1000 किलो एमडी पकडले. दिल्लीत पहिल्या कारवाईत 400 आणि दुसऱ्या कारवाईत 700 किलो एमडी ड्रग्ज पकडले. अवघ्या ३ दिवसात पुणे पोलिसांनी जप्त 3 हजार कोटींचे एमडी ड्रग्स पकडले.

  अशी केली पोलिसांनी कारवाई

  गेल्या ३ दिवसात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कारवाई

  फेब्रुवारी १८ : सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये २ किलो एम डी जप्त

  फेब्रुवारी १९ : विश्रांतवाडी येथील गोदामातून १०० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे ५५ किलो एम डी जप्त

  फेब्रुवारी २० : कुरकुंभ एमआयडीसीमधील एका कारखान्यात ११०० कोटी रुपयांचे 550 ड्रग्स आले आढळून

  फेब्रुवारी २० : पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. 2200 कोटी रुपयांचे 1000 किलो एमडी केले हस्तगत

  दिल्लीतून एकाला अटक..!