prathmesh and mugdha

माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात शुक्रवारी, १० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता ‘‘स्वरदीपावली’ हा कार्यक्रम होणार आहे.

    मुंबई,नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: आम्हाला कल्पना आहे. उद्यापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होणार आहे. साफसफाई, नवनवीन कपडे घरात दाखल झालेले आहेत. दारात कंदीलही लावला गेला आहे. रांगोळी कोणती काढायची हेही ठरलेले आहे‌. लक्ष वेधून घेतील, अशा दीपमाळा आणि पणत्या ठेवलेल्या आहेत. बच्चे कंपनीची फटाक्यांची खरेदी सुरु झाली आहे. फराळाचा खमंग सुवास दरवळतो आहे. या साऱ्या गोष्टी असल्या तरी भल्या पहाटे संगीताच्या कुठल्या दिवाळी पहाटला जायचे हा प्रश्न मनात रेंगाळत आहेच. या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे. यंदा आपल्या लोकप्रिय ‘नवराष्ट्र’ या दैनिकाने तसेच अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीने खास दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात शुक्रवारी, १० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता ‘स्वरदीपावली’ हा कार्यक्रम होणार आहे. झेब्रो फाऊंडेशन, इंडियन ऑईल, एचसीजी, डॉ. गौरी एव्हर यंग क्लिनीक, देवांगी आऊटडोअर ॲडव्हटायझिंग,सुपर्ब ग्रुप, मराठी संवर्धन मंडळ, स्वर स्पर्श हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. तसेच नवभारत फाऊंडेशन फॉर सोशल इम्पॅक्ट या कार्यक्रमाचे असोसिएट पार्टनर आहेत. तसेच लूम्स अँड वीव्हज हे गिफ्टींग पार्टनर आहेत.युएफओ सिने मीडिया नेटवर्क हे सिने मीडिया पार्टनर आहेत.

    आमच्या वाचकांना बहारदार, सुरेल, सुस्वर, प्रातःकाळी कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी ‘स्वरदीपावली’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपले लाडके गायक कलाकार ही सकाळ संगीतमय करणार आहेत. बारा वर्षांपूर्वी दाखवल्या गेलेल्या ‘सारेगमपा’ या कार्यक्रमांमध्ये आपल्या स्वरांची जादू दाखवून जगभरातल्या तमाम प्रेक्षकांना या गायकांनी जिंकून घेतले होते असे दोन सूरमणी गायक आपल्या भेटीला येणार आहेत. पहिला सूरमणी आहे प्रथमेश लघाटे, दुसरी आहे मुग्धा वैशंपायन. या जोडीने हा कार्यक्रम सुरेल, देखणा करायचे ठरवलेले आहे.

    भक्ती गीते, भावगीत, अभंग, नाट्यगीते असे सर्वच गीत प्रकार प्रथमेश आणि मुग्धा हे दोघं उत्तम गातात. चित्रपट, मालिका आणि अल्बमसाठी ते गाणे सादर करतातच परंतु वैयक्तिकरित्या गेल्या अनेक वर्षांपासून ते रंगमंचावर संगीताचे कार्यक्रम सादर करत आहेत. असे हे प्रेक्षक प्रिय असलेले गायक कलाकार नवराष्ट्रच्या व्यासपीठावरती एकत्र येणार आहेत. संगीताचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आठवण, किस्से, अनुभव हे आलेच. त्यामुळे दोन गीतांमधला दुवा साधण्याचे काम निवेदक मयुरेश साने हे करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत हे करणार आहेत. याशिवाय मनीष ठूमरे, विनय चेऊलकर, निषाद करलगीकर, निरंजन लेले यांचा वादक कलाकार म्हणून सहभाग असणार आहे.तेव्हा या कार्यक्रमाला यायला विसरू नका.