Yavatmal Female Officer

यवतमाळ नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांनी शहरात मान्सूनपूर्व कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यात सांडपाणी नाल्यात वाहून नेणाऱ्या मोठ्या व मुख्य नाल्यांचे सफाई अभियान सुरू केले. शनीमंदिर ते मच्छी पुल या नाल्याची छोटी गुजरी परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी नाला स्वच्छ करणाऱ्या 40 कामगारांसमवेत स्वतः मुख्याधिकारी यांनी नाल्यात उतरुन हातात फावडे घेतले. मुख्याधिकारी प्रत्यक्ष नाला साफ करीत असल्याचे पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला( Navelesfai done with the chief staff of Yavatmal Municipality).

    त्यांनी स्वतः काम करीत कामगारांना निर्देश दिले. शहरातील आझाद मैदान मधुन जाणारा आणि हनुमान आखाडा परिसरातून येणारा नाला याशिवाय इतर नाल्याची देखील साफसफाई सुरू झालेली आहे.

    शहरातील सर्व नाल्या आणि नाले मे महिन्यापूर्वी स्वच्छ करणे तसेच शहरात रस्त्यावर कोठेही डबके साचणार नाही याची खबरदारी घेणे यासाठी देखील मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काम सुरू केले आहे.