नवी मुंबईत होणार सूफिया भवन, मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

या कार्यक्रमात भाजप नेता हाजी अरफात शेख यांची ऑल इंडिया सुफी बोर्डचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

    मुंबई : येत्या काही वर्षात नवी मुंबईत सूफी भवन होणार आहे. तेथे सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. या सूफी भवनासाठी राज्य सरकार पाच कोटींच्या निधी देणार असल्याची घोषणा मंत्री अब्दुल सत्तर यांनी केली. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रंगशारदा नाट्यगृहात ‘एक शाम गरीब नवाज’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजप नेता हाजी अरफात शेख यांची ऑल इंडिया सुफी बोर्डचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर, आदिल नवाज कादरी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

    या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तर उपस्थित होते. यावेळी अरफात यांनी नवी मुंबईत सूफियों भवनाची मागणी राज्य सरकारकडे केली. यावेळी सत्तार यांनी नवी मुंबईत सूफी भवन बनविण्याची मागणी मान्य करत पाच कोटींच्या निधीची घोषणा केली. या कार्यक्रमात भाजप आमदार आशीष शेलार, काँग्रेस आमदार अमिन पटेल यासह देशभरातील सूफी समाज मोठ्या सख्येने सहभागी झाला होता. यावेळी

    शेख म्हणाले की, नवी मुंबईत सूफी भवन होणार असून तेथे सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील. तसेच राज्यभरात एक अध्यक्ष निवडण्यात येणार असून येत्या १५ दिवसात सर्व कमिटी तयार होणार आहे. सूफी बोर्डचा मुख्यालय कर्नाटकमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले.