नवी मुंबईत महानगरपालिकेत बदल्यांचे वारे

प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ पालिकेच्या विविध आस्थापनेवर काम करणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कार्यपद्धतीची माहिती करून घेतली.

  नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्रशासक तथा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. यात काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, तर काही जणांकडे अतिरिक्त कार्यभारदेखील देण्यात आला

  प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ पालिकेच्या विविध आस्थापनेवर काम करणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कार्यपद्धतीची माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी कामात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने बदल्यांचे हत्यार उपसले. बदल्या आणि अतिरिक्त कार्यभाराचे आदेश त्यांनी नुकतेच काढले आहेत. मागील काही वर्षांपासून एकाच विभागात असल्याने अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या केल्या आहेत.

  अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. शुक्रवारी बेलापूर ते दिघा विभाग कार्यालयासह महापालिका मुख्यालय तसेच इतर कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या तब्बल १७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या आहेत.

  तत्काळ हजेरीचे आदेश

  यामध्ये शाखा अभियंता, करारावरील कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता विद्युत, करारावरील लिपिक एक्झिलरी नर्स मिडवाईफ, सफाई कामगार, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कोपरखैरणे येथील नवीन नागरी आरोग्य केंद्रासाठी कर्मचारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत, उपअभियंता, शिपाई, करारावरील शिपाई, करारावरील कनिष्ठ अभियंता, उद्यान अधीक्षक, माळी बहुउद्देशीय सेवक, उद्यान सहायक, वरिष्ठ उद्यान सहायक आदींचा समावेश आहे.

  संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश आयुक्तांनी दिल् असून, रजेवर जाणे अथवा अनुपस्थित राहणे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे