रिपाइंच्या तालुकाध्यक्षपदी नवनाथ कांबळे

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कांबळे यांची सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

     शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कांबळे यांची सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.कांबळे यांनी यापूर्वी पदाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कामांची तसेच पक्षासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची पुन्हा तिसऱ्यांदा   शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल वरिष्ठांनी घेत तिसऱ्यांदा निवड केल्याने आपण अजूनही जोमाने जनतेची कामे मार्गी लावणार असल्याचे नवनाथ कांबळे यांनी सांगितले.