
नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. नवनीत राणांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी डोक्याला भगवं उपरणं बांधलंय. काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केलीय.
मुंबई : खासदार नवनीत राणा सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अमरावतीतील एका कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये त्यांचा उल्लेख ‘हिंदू शेरनी’ असा करण्यात आलाय. तर दुसरीकडे आज रामनवमी (Ramnavami) निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा एक व्हिडिओ (Video) तुफान व्हायरल झाला आहे. नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. नवनीत राणांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी डोक्याला भगवं उपरणं बांधलंय. काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केलीय. ‘ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम’, असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली.
खासदार नवनीत राणांची बुलेटस्वारी pic.twitter.com/l0t2lHNl3K
— manjiri Kalwit (@KalwitManjiri) March 30, 2023
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राम नवमीनिमित्त रामभक्तांना तसेच राज्यातील तमाम जनतेला विशेष शुभेच्छा दिल्यात. या व्हिडिओत त्या एका फारशी रहदारी नसलेल्या रस्त्यावर बुलेट चालवत जाताना दिसत आहेत. व्हिडिओत दिसतंय की त्यांनी आधी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांनंतर खास स्टाइलमध्ये त्यांनी बुलेटस्वारी केली. डोक्याला भगवं उपकरण आणि काळा ड्रेस परिधान केल्याने नवनीत राणा यांचा हा लूक एकदम खास आहे.
‘हिंदू शेरनी’ लिहिलेले पोस्टर्स
येत्या 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस यानिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अमरावतीत येत्या काही दिवसात 111 फुट उंचीची हनुमान मूर्ती विराजित केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम 6 एप्रिल या दिवशी केला जाईल. यावेळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामार्फत सामुहिक हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळतंय. कारण यावर नवनीत राणा यांचा उल्लेख ‘हिंदू शेरनी’ असा करण्यात आलाय.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालिसा पठनासाठी केलेलं आंदोलन, याविरोधात त्यांच्याविरोधात दाखल झालेला देशद्रोहाचा गुन्हा आणि 14 दिवसांचा तुरुंगवास या सर्व घटनाक्रमाचे फोटो असलेले भव्य पोस्टर अमरावती तसेच मुंबईतही झळकवण्यात आले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी हे पोस्टर्स झळकवण्यात आलेत.