“मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पू…”, नवनीत राणांची टीका

नवनीत राणा म्हणाल्या, “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलो करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे.

    नवी दिल्ली – अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर सडकून टीका केली. “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत,” अशी टीका राणांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही फॉलोव करतो, असंही म्हटलं. त्या शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) अमरावतीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

    नवनीत राणा म्हणाल्या, “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलो करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही.”

    “अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्राचं खूप चांगलं झालं असतं,” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.