MP Navneet Rana with ST staff

उमेश कोल्हेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    अमरावती : अमरावतीमध्ये काही दिवसांपुर्वी झालेल्या औषध व्यापाराच्या हत्येप्रकरणी अमरावतीच्या खासदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीलं आहे. उमेश कोल्हेच्या हत्येची सीबीआय अथवा एनआयए मार्फत चौकशी करावी अशी माहिती त्यांनी या पत्रातून केली आहे.

    अमरावतीत काही दिवसांपूर्वीचं एका औषध व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे या घटनेचा संदर्भ उदयरपुरच्या घटनेशी लावला जात आहे. या हत्येप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे.

    नुपूर शर्माचं समर्थनार्थ पोस्ट केल्यानं झाली हत्या?

    उमेश कोल्हेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान, अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी या प्रकरणात चोरीची केस दाखल करून 4 आरोपींना ताब्यात घेत हे प्रकरण शांत करण्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच ही घटना उदयपूर हत्याकांडासारखी आहे. तसेच अमरावतीच्या पालकमंत्र्याच्या दबावाखाली येऊन आरती सिहं यांनी या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय़ अथवा एनआयए मार्फत चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.