नवनीत राणा बारमध्ये काम करत होत्या; विद्या चव्हाण यांची टीका

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज दिल्लीतील एका प्राचीन हनुमान मंदिर आहे. हनुमान चालीसा पठण केले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण चांगल्याच संतापल्या. कोण आहेत या नवनीत राणा त्यांना एवढे का महत्त्व द्यायचे..? कुणीही उठ सूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतात. हे अतिशय संतापजनक आणि चीड आणणारे आहे. हनुमान चालीसा म्हणून हिंदुत्व दाखवणाऱ्या या नवनीत राणा आधी बारमध्ये काम करत होत्या. हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन खासदार झालेल्या महिलेला किती महत्त्व द्यायचे, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला(Navneet Rana was working in a bar; Criticism of Vidya Chavan).

    मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज दिल्लीतील एका प्राचीन हनुमान मंदिर आहे. हनुमान चालीसा पठण केले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण चांगल्याच संतापल्या. कोण आहेत या नवनीत राणा त्यांना एवढे का महत्त्व द्यायचे..? कुणीही उठ सूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करतात. हे अतिशय संतापजनक आणि चीड आणणारे आहे. हनुमान चालीसा म्हणून हिंदुत्व दाखवणाऱ्या या नवनीत राणा आधी बारमध्ये काम करत होत्या. हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन खासदार झालेल्या महिलेला किती महत्त्व द्यायचे, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला(Navneet Rana was working in a bar; Criticism of Vidya Chavan).

    विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांनी महिलांना बोलावून कुकर वाटप केले होते. मात्र, या कुकरला झाकण नसल्याचे महिलांच्या लक्षात आले महिलांनी याबाबत राणा यांच्याकडे विचारणा केली असता आधी मतदान करा मग झाकण देतो, असे राणा यांनी सांगितले होते, असा आरोपही चव्हाण यांनी आमदार राणा यांच्यावर केला आहे. त्यामुळे राणा यांची मानसिकता आणि वृत्ती काय आहे ते उघड होते, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.