नवनीत राणा यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, जेलमधील अनुभव सांगताना रडल्या; नेमकं काय म्हणाल्या?

हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. रवी राणा आणि नवनीत राणा आणि ठाकरे कुटुंब वाद गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज रवी राणा यांंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

    अमरावती : हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. रवी राणा आणि नवनीत राणा आणि ठाकरे कुटुंब वाद गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आज रवी राणा यांंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

    नेमकं काय म्हणाल्या राणा?

    नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच जिथे जिथे मविआची सभा होईल, तिथे-तिथे हनुमान चालीसाचं पठण करणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. माजी काय चूक होती? राज्यावरचं संकट दूर व्हाव, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसेचं पठण करावं एवढीच विनंती मी केली होती. मात्र तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही, मुलं विचारायचे आई तु काय गुन्हा केलास? असं राणा यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. विचार काय असतात आणि त्यासाठी कसे लढावे हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विचार धुळीस मिसळवले. ते पक्षाची विचारधारा सांभाळू शकले नाहीत. ते पक्ष सांभाळू शकले नाहीत अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच जिथे-जिथे मविआची सभा होणार तिथे-तिथे हनुमान चालीसेचं पठण करणार असल्याचा इशाराही यावेळी नवनीत राणा यांनी दिला आहे.