माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जेलमध्ये किंवा पोलीस कोठडीत असताना मतदान करता येत नाही, असे या याचिकेच्या सुनावणीत न्यायाधिशांनी म्हटले(Nawab Malik, Anil Deshmukh denied voting permission by Bombay HC).
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबरदस्त फटका बसला आहे. बडे नेते जेलमध्ये दोन महत्वाची मतं बुडाली आहेत. याचा परिणाम निकालावर पहायला मिळू शकतो.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जेलमध्ये किंवा पोलीस कोठडीत असताना मतदान करता येत नाही, असे या याचिकेच्या सुनावणीत न्यायाधिशांनी म्हटले(Nawab Malik, Anil Deshmukh denied voting permission by Bombay HC).
राष्ट्रवादीच्या मलिक आणि देशमुख यांना विधान परिषदेच्या मतदानाचा हक्क मिळणार का याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. उच्च न्यायालयाने मागणी फेटाळल्यानंतर मलिक आणि देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांची परवानगी फेटाळली.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली आहे.