nawab malik and sameer wankhede

समीर वानखेडे यांच्या जन्म दाखलाबाबत(Sameer Wankhede Birth Certificate) आणि जाती प्रमाणपत्राबाबत (Cast Certificate Of Sameer Wankhede) त्यांच्याकडून अद्यापही नेमक्या कागदपत्राची पूर्तता करण्यात आलेली नाही. भारत सरकारच्या महत्वाच्या पदावर असूनही त्यांना याबाबत न्यायालय आणि जात पडताळणी समितीसमोर अद्याप योग्य तो खुलासा करण्याची संधी आहे. मात्र त्यांच्याकडून याबाबत माहिती आल्यानंतरच सत्य समोर येणार आहे,असे नवाब मलिक (nawab Malik) म्हणाले.

    मुंबई: मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडेंचा (Sameer Wankhede) विषय उच्च न्यायालयात आहे, त्याचा मी आदर करतो. न्यायालयाने तक्रारदार होण्याची विचारणा केल्याने आम्ही तक्रारदार बनलो, मात्र आयआरएस अधिकारी कुठल्या कागदाच्या जोरावर अधिकारी बनला, राखीव जागेवर परीक्षा दिली, कागदपत्र असली पाहीजे, एखादा मोठा अधिकारी कागदपत्र सादर करत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आम्हाला खात्री आहे की, बोगस पुराव्यांच्या (Fake Document Of Sameer Wankhde) आधारे हा दाखला घेतला गेला, सत्य समोर येणार, असा दावा अल्पसंख्याक कल्याण मंत्री नबाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा केला आहे.

     सत्य समोर येणार
    माध्यमांशी बोलताना मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांच्या जन्म दाखलाबाबत आणि जाती प्रमाणपत्राबाबत त्यांच्याकडून अद्यापही नेमक्या कागदपत्राची पूर्तता करण्यात आलेली नाही. भारत सरकारच्या महत्वाच्या पदावर असूनही त्यांना याबाबत न्यायालय आणि जात पडताळणी समितीसमोर अद्याप योग्य तो खुलासा करण्याची संधी आहे. मात्र त्यांच्याकडून याबाबत माहिती आल्यानंतरच सत्य समोर येणार आहे.