नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने मलिक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने मलिक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कुर्ला येथील रुग्णालयात नवाब मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.

    नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी ते तुरुंगातून बाहेर आहेत. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसलेले नाहीत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत.