झारखंड मधील नक्षलवाद्याला नालासोपाऱ्यात अटक, ठाणे एटीएसची मोठी कारवाई

ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकान आज पहाटे नालासोपारा येथील धानवी, रामनगर येथे ही कारवाई केली.

    ठाणे : झारखंड सरकारकडून शोध सुरू असलेल्या एका नक्षलवाद्याला पालघरमधील नालासोपारा (Nalasopara) परिसरात अटक करण्यात आली आहे. कारु हुलाश यादव (45 वर्षे) असं त्याच नाव आहे. मह्त्त्वाचं म्हण्जे त्याच्यावर झारखंड सरकारनं 15 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं.

    ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकान आज पहाटे नालासोपारा येथील धानवी, रामनगर येथे ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका चाळीवर छापा टाकला. या चाळीतून कारु हुलाश यादवला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा व्यक्ती मुळचा डोडगा, तालुका कटकमसांडी, जिल्हा हजारीबाग, झारखंड येथील रहिवाशी असून तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटीचा सदस्य आहे. 2004 पासून नक्षली कारवाईमध्ये सक्रिय असून, त्याच्यावर झारखंड सरकारनं 15 लाखांचे बक्षीस ठेवले आहे.