Naxals set fire to half a dozen vehicles in Bhamragad taluka! Billions of rupees lost by the contractor

विसामुंडी गावाजवळील नाल्यावर संबंधित कंत्राटदारामार्फत पुल निर्मितीचे काम सुरु आहे. बुधवारी संबंधित पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सदर बांधकामावरील वाहने विसामुंडी गावाजवळ उभ्या होत्या. दरम्यान रात्रीच्या सुमारास सशस्त नक्षल्यांनी गावात प्रवेश करीत उभ्या असलेल्या ६ वाहनांना आगीच्या भक्षस्थानी टाकले.

    गडचिरोली : जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या भामरागड तालुक्यात (Bhamragad taluka) मागील काही दिवसांपासून नक्षल्यांच्या हिंसक कारवायाचा (Violent actions of Naxals) सिलसिला कायम आहेत. अशातच तालुक्यातील नारगुंडा पोलीस (Nargunda Police ) मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या विसामुंडी (Visamundi) येथे नक्षल्यांनी( Naxals ) तब्बल अर्धा डझन वाहन (Half a dozen vehicles ) आगीच्या भक्षस्थानी (were destroyed ) घातल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात संबंधित कंत्राटदाराचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. या नुकताच काही दिवसांपासून या परिसरात नक्षल्यांनी एका दिव्यांग युवकाची हत्या घडवून आणली होती. यातच या जाळपोळीमुळे सदर परिसरात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे.

    सहा वाहने जळून खाक
    विसामुंडी गावाजवळील नाल्यावर संबंधित कंत्राटदारामार्फत पुल निर्मितीचे काम सुरु आहे. बुधवारी संबंधित पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सदर बांधकामावरील वाहने विसामुंडी गावाजवळ उभ्या होत्या. दरमयान रात्रीच्या सुमारास सशस्त नक्षल्यांनी गावात प्रवेश करीत उभ्या असलेल्या ६ वाहनांना आगीच्या भक्षस्थानी टाकले. यामध्ये १ पोकलैड मशीन, १ जेसीबी, २ ट्रैक्टर याचे समवेत १ दुचाकी वाहनाचा समावेश आहे. यात संबंधित कंत्राटदाराचे कोटी रुपयाची नुकसान झाले असल्याची माहिती आहे. नक्षल्यांनी या वाहनासोबतच अन्य साहित्य आगीच्या भक्षस्थानी टाकल्याची माहिती आहे.

    नक्षल्यांद्वारे मजूरांना मारहाण
    नक्षल्यांनी विसामुंडी गावात प्रवेश करीत संबंधित बांधकामावरील उभ्या असलेल्या वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या कामावरील काही मजुरांना बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. सशस्त्र असलेल्या नक्षल्यांनी संबंधित मजूरांना यानंतर पुन्हा काम करण्याची धमकी देत यातील दोन मजूरांना मारहाण केली. नक्षल्यांनी बांधकामावरील मजूरांना केलेल्या या मारहाणीमुळे मजूरांवर गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे.

    विकास कामात नक्षल्यांची आडकाठी
    भामरागड तालुक्यातील विसामुंडी या आदिवासीबहूल दुर्गम भागात पुलाचे बांधकाम मागील एक वर्षापासून सुरु होते. संबंधित परिसरातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे सदर बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली होती. पुला अभावी या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने शासन स्तरावरुन निधी मंजूर करीत संबंधित कंत्राटदारामार्फत सदर बांधकाम सुरु करण्यात आले होते. मात्र बांधकाम सुरु असतांना या बांधकामावरील ६ वाहनांची नक्षल्यांद्वारे जाळपोळ करण्यात आल्याने नक्षल्यांप्रती नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.