शरद पवारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; ठाण्यात छगन भुजबळांविरोधात आंदोलन

अजित पवार गटाच्या उत्तर सभामध्ये बोलताना दोन मिनिटातच भुजबळांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. कारण शरद पवारांवर टीका करताच उपस्थितांमध्ये हुल्लडबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, २००४ साली तेलगी प्रकरणात माझ्या राजीनामा का घेतला गेला.

  ठाणे – काल अजितदादा पवार (Ajit pawar) गटाची बीडमध्ये सभा झाली होती. यावेळी अजितदादा गटाने मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. तर मंत्री धनंजय मुंडे व मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात टीका केली होती. याचे आज पडसाद उमटताना दिसत आहेत. २००४ साली तेलगी प्रकरणात माझ्या राजीनामा का घेतला गेला, असा सवाल भुजबळांनी उपस्थित करत, शरद पवारांवर टीका केली होती. यानंतर आज ठाण्यात भुजबळ विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. (ncp activists aggressive after sharad pawar criticism protest against chhagan bhujbal in thane)

  भुजबळाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

  दरम्यान, आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून, छगन भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. शरद पवारांचे कार्यकर्ते छगन भुजबळ यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. राज्यात जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. शरद पवार यांची बीडमध्ये सभा झाल्यानंतर अजित पवार यांची सभा ही उत्तर सभा होती, असेही म्हटले जात आहे. या सभेत अजित पवारांपेक्षा जास्त गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केले.

  गुगली आपल्याच माणसांवर टाकायचा असतो का

  2019 मध्ये अजित दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तुम्ही सांगितलं की ती गुगली होती. ही कसली गुगली? स्वतःच्याच प्लेअरला आऊट करायचं का? राजकारणात अशा गुगल्या असतात का? आणि जर तुम्ही गुगली टाकला म्हणता, मग आपल्याच माणसांवर गुगली टाकायचा असतो का, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

  …मग राजीनामा का घेतला

  काल अजित पवार गटाच्या उत्तर सभामध्ये बोलताना दोन मिनिटातच भुजबळांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. कारण शरद पवारांवर टीका करताच उपस्थितांमध्ये हुल्लडबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, २००४ साली तेलगी प्रकरणात माझ्या राजीनामा का घेतला गेला, असा सवाल भुजबळांनी उपस्थित करत, शरद पवारांवर टीका केली होती. यानंतर आज ठाण्यात भुजबळ विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.