वडगावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरुद्ध आक्रमक; घंटानाद आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध

मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) वतीने राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज (दि.01) रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच ग्रामदैवत पोटोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

    मावळ : मावळ तालुक्यामध्ये (Maval Taluka) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) (NCP) वतीने राज्यातील महायुती सरकारच्या (State Goverment) विरोधात आज (दि.01) रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच ग्रामदैवत पोटोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देत समाजातील युवा, विद्यार्थी आणि शेतकरी असे सर्वच घटक त्रस्त असून अनेक प्रश्न मांडण्यात (Politial News) आले.

    यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना आपल्या समस्यांचे निवेदन दिले. या निवेदनामध्ये ते म्हणाले, समाजातील युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिलासुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमालाला भाव नाही. अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊन ही विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही. हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत. महिलांच्या सुरक्षा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडं सरकार ढुंकूनही बघत नाही. राज्यात ३२लाख युवा स्पर्धा परीक्षा रखडलेली असून अडीच लाख रिक्तपदांची भरती,विद्यार्थ्यांचे शिक्षण,आदी विविध प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. अशी तक्रार निवेदनातून मांडत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) आंदोलनकर्त्यांनी घंटानाद केला. सरकार जातीयवाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढं आणून लोकांचं लक्ष दुसरी कडे वळवण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला.

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी मागील चार वर्षाच्या काळात वाढणारी बेरोजगारी, पेपरफुटी व त्यावर कायदा, कंत्राटी नोकरभरती, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग यांसह असंख्य प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले तसेच राज्यातील युवकांचे, महिलांचे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सरकारच्या पातळीवर लढा उभा करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. या लढ्याला महाराष्ट्रातून जनतेचा व युवकांचा मिळणारा पाठिंबा पाहून केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या आडून राजकीय सूड उगवण्याचे काम सध्या भाजपा करत आहे. असा घणाघात त्यांनी केला.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या च्या घंटानाद आंदोलनावेळी वतीने तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिलाध्यक्षा जयश्री पवार, मिकी कोचर, अक्षय मुऱ्हे, किसन कदम, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे, पांडुरंग दाभाडे, भरत राजिवडे, नवनाथ केदारी, सुनील शिंदे, रमेश घोजगे, मंगेश खैरे, आफताब सय्यद, आदिनाथ मालपोटे, योगेश करवंदे, सोमनाथ धोंगडे, बारकू ढोरे, नितीन भांबळ, पंकज सांबरे राजेश बाफना,शंकर मोढवे प्रणव ढोरे,राहील तांबोळी आदी उपस्थित होते.