अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष, त्यामुळे कारवाईची चिंता करू नका, मंत्री अनिल पाटील यांचा शरद पवार गटाला टोला

देशात आणि अमळनेर तालुक्यात विकासाची गंगा जर आणावयाची असेल तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावं लागेल, अस विधान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलं आहे.

    मंत्री अनिल पाटील : अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे कारवाईची चिंता करू नका. त्यामुळे पक्षाचे नेते अजित दादा पवार हे जे ठरवतील त्यानुसार आम्हाला कारवाईला सामोरे जावे लागेल. असे म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला आव्हान दिलं आहे. अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्युल १० अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाने केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांनी शरद पवार गटाला आव्हान दिलं आहे

    पुढे ते म्हणाले, किती इंजिन हे मोजण्यापेक्षा हे युतीचं इंजिन आहे. आताच्या या युतीला इंजिन याला तीन डबे आहेत. येणाऱ्या काळात आणखी डबे जोडले जाणार आहेत. आणखी डबे म्हणजेच या विधानातून मंत्री अनिल पाटील यांनी आणखी इतर पक्ष हे युतीत सहभागी होतील असा दावा केला आहे. तीन इंजिन सोबत अजून एक इंजिन जोडले जाणार होते. मात्र आम्ही म्हणालो तीन इंजिनवर व्यवस्थित सुरू आहे म्हणून चौथे इंजिन फलाटावर उभे आहे अस विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे, यावर मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने बॅनर लावून मुख्यमंत्री आणि मंत्री होत नाही. मंत्री किंवा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर १४८ चा आकडा गाठावा लागतो. बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला आहे. आमदार रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्यावर मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे

    पुढे मंत्री अनिल पाटील म्हणाले, लोकसभेत उमेदवारी कोणी कोणाला द्यायची हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. उज्वल निकम साहेब इच्छुक आहेत किंवा नाही हे मला माहीत नाही. सर्वेक्षण केल्यानंतर युती म्हणून सर्वांना चालणारा उमेदवार हा रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात असेल आणि युती म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल. विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचे नाव भाजकपडून जळगाव लोकसभा मतदारसंघात जाहीर करण्यात आले आहे. यावर मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी स्पष्टीकरण दिल आहे. देशात आणि अमळनेर तालुक्यात विकासाची गंगा जर आणावयाची असेल तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करावं लागेल, अस विधान मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलं आहे. आणि मला दुसऱ्यांदा मंत्री मंडळात सहभागी केलं पाहिजे, अस म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी एकप्रकारे पुन्हा मंत्री होण्याची अपेक्षा बोलून दाखवली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे अशी इच्छा सुद्धा यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.