‘हे विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम…’ ईडीच्या कारवाईवरुन अनिल देशमुख आक्रमक

माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांनी पत्रकार परित्रद घेत विरोधकांवर होणाऱ्या कारवाऱ्या यावरुन सत्ताधारी पक्षांवर जहरी टीका केली. विरोधकांच तोंड बंद करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

    नागपूर : विरोधकांच्या पाठीमागे केंद्रीय तपास एजन्सीचा (Central Investigation Agency) ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. रोहित पवार यांना ईडीचे (Rohit Pawar ED Case) समन्स आल्यानंतर आता पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. अनिल देखमुख यांनी पत्रकार परित्रद घेत विरोधकांवर होणाऱ्या कारवाऱ्या यावरुन सत्ताधारी पक्षांवर जहरी टीका केली. विरोधकांच तोंड बंद करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

    पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल देखमुख म्हणाले, “आज पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आहे. हे ठरवून सुरू आहे. विरोधकांना त्रास दिला जात आहे. यात केंद्रीय एजन्सी टार्गेट करत आहेत. ईडी कार्यालयात रोहित पवार जाणार आहेत. राष्ट्रवादी रोहित पवार यांच्या पाठीशी आहे. रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली म्हणून ही कारवाई त्यांच्यावर करण्यात येत आहे.” अशी घणाघाती टीका अनिल देखमुख यांनी केली

    ते पुढे म्हणाले, “केंद्रीय एजन्सीचा वापर करुन विरोधकांच तोंड बंद करण्याचे काम सुरू आहे. आणि हे महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीत केजरीवाल, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना ही त्रास दिला जात आहे. मला त्रास दिला, संजय राऊतांना त्रास दिला. याची सुरुवात शरद पवार यांच्यापासून झाली. भाजपच्या एकतरी नेत्यांवर कारवाई केली का? ते कोणालाही अटक करू शकतात, अटक झाली की बेल होत नाही. उघड्या डोळ्यांनी जनता पाहत आहे. निवडणूका जवळ येतील तसे तसे याला वेग येईल.” असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

    भाजपमधील अंतर्गत कलह समोर आणत अनिल देशमुख म्हणाले, “भाजपचे आमदार अस्वस्थ आहेत. बाहेरून आलेले पहिल्या पंगतीत बसले, आमचा नंबर लागला नाही, असं बोलतात. वारंवार कारवाई होतात, आम्ही विरोधक आहोत म्हणून कारवाई होत आहे.” असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.