MP Supriya Sule honored

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार कुटुंब नाही ,ही विचार धारेची लढाई आहे, माझे माहेर बारामती असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातून मी तिकीट मागणार आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सध्या कामाचा ताण असल्याने ते बारामतीत आले नाहीत, अ सा निर्वाळा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.

    बारामती:  राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार कुटुंब नाही ,ही विचार धारेची लढाई आहे, माझे माहेर बारामती असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातून मी तिकीट मागणार आहे, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सध्या कामाचा ताण असल्याने ते बारामतीत आले नाहीत, अ सा निर्वाळा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.

    गेल्या अनेक दिवसानंतर खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बारामती शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या कला दालनास भेट दिली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

    यावेळी खा.सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेमध्ये सध्या अंतर आलेले आहे. यात पवार कुटुंबाचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेली २४ वर्षे पवार साहेबांचे नेतृत्व मान्य करून असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचंड कष्ट करून महाराष्ट्रासह देशाची सेवा केली. त्यामुळे हा कौटुंबिक विषय नाही. यात राजकारण व समाजकारण आहे. आम्ही सगळेच मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात व समाजकारणात आलेलो आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन गटांचा पवार कुटुंबाशी काही संबंध नाही,असे खा.सुळे म्हणाल्या.

    उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आले नसल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, अजितदादा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतात हे मी टीव्हीवर पाहते. शासन आपल्या दारी यासह इतर कार्यक्रमात ते व्यस्त आहेत. ते दिल्लीला देखील गेले होते, हे मी टीव्हीवर पाहिले. सध्य राज्यात पाऊस नाही. अजित दादा लवकरच बारामतीतील असा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

    बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, बारामती हे माझे माहेर आहे‌ व‌ माझी कर्मभूमी ही ‌‌‌‌‌आहे. लोक माझ्याबरोबर राहतील असं मला विश्वास आहे, या ठिकाणी असणार माझं राजकारण हे समाजकारण आहे. माहेर या नात्याने मी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठीच उमेदवारी मागणार आहे.