मावळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व; आमदार सुनील शेळके यांची हवा

मावळ तालुक्यातील इंदोरी, गोडुंबरे, देवले,कुणेनामा, वर्सोली सावळा भोयरे शिरगाव व निगडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवार ( दि १८) रोजी मतदान झाले होते आज (दि २०) रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

    वडगाव मावळ – ग्रामपंचायतीत वर्चस्वाची लढाई असलेल्या मावळ तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल जाहीर झाला.त्यात ६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळविले,तर ३ ग्रामपंचायतींवर भाजपाला समाधाना मानावे लागले.

    मावळ तालुक्यातील इंदोरी, गोडुंबरे, देवले,कुणेनामा, वर्सोली सावळा भोयरे शिरगाव व निगडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवार ( दि १८) रोजी मतदान झाले होते आज (दि २०) रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

    शिरगाव ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यात इंदुरी व देवळे ग्रामपंचायतचे सदस्य संपूर्ण बिनविरोध निवड झाली होती.

    निगडे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती निगडे सरपंचपदी राष्ट्रवादीचे भिकाजी भागवत विजय झाले तर इंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विजय झाले आहेत.

    सरपंच पदाचे विजय उमेदवार पुढील प्रमाणे
    १) इंदोरी ग्रामपंचायत
    १)शशिकांत शिंदे विजयी (१७७५) मते
    २) मधुकर ढोरे १४१२
    २) अंकुश ढोरे ११२५
    ४) नोटा १२४

    २ ) गोडंबरे ग्रामपंचायत
    १)निशा सावंत (३७६) मते विजयी
    २) कल्पना सावंत २४९ मत
    ३) प्रियंका चोरगे १३३
    ४) मोहिनी कदम २७
    ५) नोटा ०६

    ३) देवले ग्रामपंचायत
    १ )वंदना आंबेकर विजयी ५८२ मते
    २) सोनाली गिरी ३६१
    ३)माया यादव २६
    ४) नोटा ०५

    ४) सावळा ग्रामपंचायत
    १)मंगल ढोंगे विजयी ४५४ मते
    २) मनिषा आढारी २८८
    ३)नोटा २०

    ५)भोयरे ग्रामपंचायत
    १) वर्षा भोईरकर विजयी ४८९
    २) सुरेखा भोईरकर ३८१
    ३)रोहिणी अडीवळे १८९
    ४) नोटा ३

    ६) निगडे ग्रामपंचायत
    १ ) भिकाजी भागवत ६५४ विजयी
    २) संदेश शेलार ६४०
    ३)नोटा ०७

    ७)कुणे नामा ग्रामपंचायत
    १) सुरेखा उंबरे ५०६ विजयी
    २) नलिनी उघडे २८४
    ३) रेशमा जाधव: १६९
    ४) राणी भोरडे ०४१
    ५) नोटा १५

    ८)वरसोली ग्रामपंचायत
    १) संजय खांडेभराड ७०९ विजयी
    २) बबन खरात ५३९
    ३)नोटा २५