राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणावा लागेल : प्रफुल्ल पटेल

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर होत आहे, शिबिराच्या दुसर्‍या व शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली. पक्ष वाढीसाठी आपणाला काम करावे लागेल, तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणावा लागेल. यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना काम करावे लागेल, असं माजी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.

    शिर्डी : शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर होत आहे, शिबिराच्या दुसर्‍या व शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली. पक्ष वाढीसाठी आपणाला काम करावे लागेल, तसेच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणावा लागेल. यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना काम करावे लागेल, असं माजी खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.

    दरम्यान, आज शिबिराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांनी थेट रुग्णालयातून शिबिरात दाखल झाले. त्यामुळे कार्यकत्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली. शरद पवार येणार म्हटल्यावर आज सकाळपासून कार्यकर्ते यांच्यात जोश व उत्साह दिसत होता. आज शेवटच्या दिवशी बोलताना माजी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भाजप व राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात किती आमदार व खासदार आहेत याचा पाढा वाचून दाखवला. तसेच आगामी काळात आपणाला या ठिकाणी आपले आमदार व खासदार वाढवावे लागतील, आपला पक्ष एक नंबरवर आणावा लागेल, यासाठी तुम्हाला लोंकापर्यंत पोहचावे लागेल असं पटेल यांनी म्हटले.

    अजित पवार अनुपस्थित

    पक्षाच्या शिबिराला पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार शिर्डीतून निघून गेले. शिबिराच्या दुसर्‍या दिवशी ते अनुपस्थित होते. याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली. अजित पवार त्यांच्या आजोळी एका कार्यक्रमानिमित्त गेले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी परवानगी घेतली आहे. त्यामुळे कुठलीही उलटसुलट चर्चा त्यांच्या अनुपस्थितीबाबत होऊ नये, असे पाटील म्हणाले.