चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकर्ती वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटकेत

    चंद्रपूर (Chandrapur) : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्तीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. वैष्णवी देवतळे असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे.

    एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. संधी साधून वाहनावर स्वतः बसून दूरपर्यंत ढकलत नेण्यात येत होते. नंतर मेकॅनिक साथीदाराच्या सहाय्याने गाडी सुरू करून विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एकूण 11 मोपेड वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीकडून जप्त केली आहेत.