महाविकास आघाडीला धक्का; ‘या’ नेत्याने घेतला भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

    सोलापूर : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांनी (Abhijeet Patil) अखेर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

    अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Lok Sabha Election) भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. पाटील यांच्या या पाठिंब्यामुळे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना मोठा दिलासा मानला जात आहे. माढा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना तर सोलापूर मतदारसंघात राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी यावेळी जाहीर केली.

    …म्हणून भाजपला पाठिंबा?

    विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने चार दिवसांपूर्वी 442 कोटी रुपयांच्या कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती. यानंतर अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा सोलापूरच्या राजकारणात सध्या सुरू आहे. याआधी कारखान्यावर ज्यांची सत्ता होती. त्यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून कारखान्यावर शिखर बँकेची कारवाई सुरू असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.