
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Ajit Pawar Press Conference) घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Ajit Pawar Press Conference) घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. ‘आमदारांच्या सह्यांबाबत सुरु असलेल्या चर्चा पूर्णपणे थांबवा, अशा सह्या घेतल्या नाहीत. परिवार म्हणून काम करत आहे. संभ्रमावस्था निर्माण करु नका’, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचेही कान टोचले.
अजित पवार हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. एकाही आमदाराची सही घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना स्वाभिमानानं झाली आहे. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे. वेगवेगळ्या चौकशा कधीपासून सुरु आहे. त्याला उत्तरं देतो’. तसेच संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, ‘आम्ही आमचं वकीलपत्र घेण्यास सक्षम आहोत. इतरांनी बोलू नये’, अशा शब्दांत अजित पवार यांनी जाहीरपणे संजय राऊत यांचे कान टोचले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
अजित पवार हे भाजपसोबत जातील, या अफवा आहेत. आम्ही आज सकाळीच बोललो. मी शरद पवार यांच्यासोबतच देखील बोललो आहे. महाविकास आघाडी ही खिळखिळी करण्याचा भाजपचा डाव आहे. पण त्यांना यश मिळणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अर्थात शिवसेना या तिघांची आघाडी मजबूत आहे. अजित पवार हे कुठेही जाणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.