अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; राज्याला दोन उपमुख्यमंत्री?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra Politics) विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिवसेनेसोबत जात सत्तेत सहभागी होत आहेत.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra Politics) विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिवसेनेसोबत जात सत्तेत सहभागी होत आहेत. अजित पवार यांनी आता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

    शिवसेना पक्षफुटीनंतर राज्यात आता पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड झाली आहे. त्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 पैकी 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र घेऊन राजभवनावर दाखल झाले. त्यानंतर आता अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर छगन भुजबळ यांच्यासह इतर आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

    मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे यांची नाव आहेत.

    अजित पवार घरातून राजभवनात पोहोचले

    महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी झाली. या बैठकीला पक्षाचे दोन्ही कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यासोबतच दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे नेते पोहोचले आहेत. बैठक आटोपल्यानंतर अजित पवार घरातून थेट राजभवनाकडे रवाना झाले.