राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार, अजित पवारांनी विधानसभेत दिलेल्या सल्ल्याकडं दुर्लक्ष..

हा अपघात मंगळवारी रात्री झाल्याची माहिती समोर येत आहे. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    परळीः राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून थोड्याच वेळात त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघातानंतर विधानसभेत बोलताना अजित पवारांनी रात्री १२ ते ३ प्रवास करु नका असा सल्ला सभागृहात सगळ्यांना दिला होता. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन सुनावलं होतं. त्याकडे मुंडेंनी दुर्लक्ष केलं आहे.

    दरम्यान, हा अपघात मंगळवारी रात्री झाल्याची माहिती समोर येत आहे. परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. त्यांच्या छातीला मार लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

    शरद पवारांचा देखील सल्ला

    मागील महिन्यात भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या अपघाताबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रात्री-अपरात्रीचा प्रवास सर्वांनी टाळायला हवा, पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, त्यामुळं शक्यतो रात्रीचा प्रवास टाळायला हवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत.