आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आगामी विधानपरिषदेकडे लागले आहे. आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. 'राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला, मात्र विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

    मुंबई : राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आगामी विधानपरिषदेकडे लागले आहे. आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला, मात्र विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

    खडसे नेमकं काय म्हणाले?

    ‘राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. जो अतिआत्मविश्वास होता किंवा ज्याप्रमाणे दुर्लक्ष झालं. ते आता दुर्लक्ष करता काम नये ही एक शिकवण आम्हाला त्यातून मिळाली. मात्र शेवटी पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा जरी झाला तरी महाविकास आघाडीचा पराभव म्हणून तो जिव्हारी लागल्यासारखा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

    पुढे बोलताना खडसे म्हणाले, ‘ आता विधानपरिषदेला दूध पिण्याच्या आधी ताकही फुंकून प्यावं लागतं तशाप्रकारे आता विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे, असं खडसे म्हणाले.

    ‘गाफील राहून मागचा पराजय झाला, अशी कबुली देत आता अधिक गाफील न राहता काळजीपूर्वक लक्ष देऊन हा विजय संपादित करायचा आहे, त्यामुळे सर्वांनी आता मागच्या पराभवाचा धडा घेऊन आता विधानपरिषदेच्या रणनीती ठरवण्याचं ठरवलेलं आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.