मराठा आरक्षणासंदर्भात जयंत पाटील म्हणाले, ‘आरक्षणाबाबत सरकार उदासीन’

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकार उदासीन आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एक बोलताहेत, उपमुख्यमंत्री दुसरे तर अर्थमंत्री तिसरेच बोलत आहेत. यावरुन मराठा आरक्षणाबाबत सरकारचे एकमत नाही हे स्पष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केली.

    मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) राज्य सरकार उदासीन आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एक बोलताहेत, उपमुख्यमंत्री दुसरे तर अर्थमंत्री तिसरेच बोलत आहेत. यावरुन मराठा आरक्षणाबाबत सरकारचे एकमत नाही हे स्पष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केली.

    राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेवून तो लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा आणि ओबीसी समाज अशी फूट पडू लागली आहे.

    या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादी पक्ष मराठा आरक्षणाबाबत ठाम आहे. मात्र, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे पाटील म्हणाले.