जिहे-कठापूरची पाणीयोजना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रखडवली; जयकुमार गोरे यांचा आरोप

माण आणि खटाव तालुक्यातील 32 गावांसाठी वरदान ठरणारी जिहे कठापूरची पाणीयोजना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ राजकारणासाठी रखडवली. कृपया या मातीतल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पाणी योजनेत राजकारण आणू नका, असे आवाहन माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore)  यांनी केले.

    सातारा : माण आणि खटाव तालुक्यातील 32 गावांसाठी वरदान ठरणारी जिहे कठापूरची पाणीयोजना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ राजकारणासाठी रखडवली. कृपया या मातीतल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी पाणी योजनेत राजकारण आणू नका, असे आवाहन माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore)  यांनी केले. तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या योजनेची निविदा तातडीने काढावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

    आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या जिहे कठापूरच्या पाणी योजनेसंदर्भातील सवंग राजकारणाचे सडेतोड खंडन करत पत्रकारांसमोर वस्तुस्थिती मांडली. ते पुढे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेचे शेवटच्या काही मीटरचे ब्लास्टिंग बाकी आहे. या पाणी योजनेसंदर्भात माझ्यावर जे आरोप झाले, त्यांची बोलायची राजकीय उंची नाही. ज्या-ज्या वेळी मी शब्द दिला आहे, त्या-त्या वेळी मी शब्द खरा करून दाखवला आहे. माण खटाव तालुक्यात चार-चार साखर कारखाने सुरू आहेत. ही स्वप्नवत कामगिरी या पाणी योजनेमुळे करणे शक्य झाले आहे.

    जिहे कठापूर योजनेची निविदा येत्या एक महिन्यात काढतात काढण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करायला लावली.