शपथविधी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे लागले खातेवाटपाकडे डोळे; आता खातेवाटप मगच विस्तार?

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात एकप्रकारे राजकीय भूकंप झाल्याचे पाहिला मिळाले.

    मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात एकप्रकारे राजकीय भूकंप झाल्याचे पाहिला मिळाले. या सर्व घडामोडीनंतर अजित पवारांसह सत्तेत सहभागी झालेल्या इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांना कोणतं खातं मिळणार याकडे डोळे लागले आहेत. असे असताना आधी खातेवाटप होईल मग विस्तार केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

    राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आधी केला जाईल आणि त्यानंतरच राष्ट्रवादीसह सर्वांचे खातेवाटप जाहीर होईल, असे म्हटले जात होते. पण आता या सर्व घडामोडीनंतर येत्या दोन दिवसांत खातेवाटप केले जाईल व नंतरच विस्तार केला जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी 2 जुलैला झाला. पण या शपथविधीला 8-9 दिवस झाले तरीही या मंत्र्यांना खातेवाटप केले गेले नाही. त्यामुळे विस्ताराची वाट न पाहता खातेवाटप करावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे.

    आदिती तटकरेंना पालकमंत्रिपद

    राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप गुरुवारपर्यंत केले जाईल, सोबतच पालकमंत्रीही जाहीर केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. पालकमंत्रिपदावरून काही जिल्ह्यात धुसफूस सुरु आहे. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे मंत्री झाल्याने रायगडचे पालकमंत्रिपद त्यांना मिळणार अशी चर्चा आहे.