‘गिरीश महाजन यांनी तोंड काळं केलंय, त्यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृतीचे लोक’; एकनाथ खडसेंची टीका

नाशिक आणि पुण्यातील गुटखा किंगवर (Gutkha King) कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर आरोप केले. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलंय.

    जळगाव : नाशिक आणि पुण्यातील गुटखा किंगवर (Gutkha King) कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर आरोप केले. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळं केलंय. त्यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. पुणे आणि नाशिकमध्ये कारवाई झालेले गुटखा किंग त्यांच्या जवळचे असल्याचा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.

    एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. अशात आता पुन्हा आमदार खडसेंनी महाजन यांच्यावर मोठा आरोप केला आहे. आमदार खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. स्वतः महाजनांवर मोक्का लागलेला आहे. ते जामिनावर सुटलेले आहेत. महाजन यांनी अनेक ठिकाणी तौद्ध काळं केलेलं आहे.

    गुटखा किंग जगताप गिरीश महाजनांच्या जवळचा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करत पुण्यात गुटखा किंग तुषार जगताप याच्यावर कारवाई करण्यात आली. तो राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचा आहे. महाजनांच्या आशीर्वादानेच तो गुटख्याचे उद्योग करायचा. याआधीही ठाकूर नावाच्या गुंडावर नाशिकमध्ये मोक्का लावण्यात आला होता. तोही महाजन यांच्या अत्यंत जवळचा होता. तो महाजन यांच्या गाडीमध्ये जवळ जाऊन फिरायचा.