सध्या महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलंय; रोहित पवारांची टीका

बीडमध्ये शरद पवारांसाठी (Sharad Pawar) भावनिक बॅनर लावले. पण त्यावर नाव लिहायचं धाडस नाही. जो नेता 60 वर्षे एक विचार जपून राहिला, त्याला अप्रत्यक्षपणे 'रिटायर व्हा', अस सांगत आहेत. सध्या महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे.

    छत्रपती संभाजीनगर : बीडमध्ये शरद पवारांसाठी (Sharad Pawar) भावनिक बॅनर लावले. पण त्यावर नाव लिहायचं धाडस नाही. जो नेता 60 वर्षे एक विचार जपून राहिला, त्याला अप्रत्यक्षपणे ‘रिटायर व्हा’, अस सांगत आहेत. सध्या महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा लोकांनी घड्याळाकडे नाही तर पवारांकडे बघितले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले.

    रोहित पवार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. त्यामध्ये त्यांनी बीड येथे जाण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यालयाची पाहणी करत विविध विषयांवर चर्चा केली. ते म्हणाले, ‘काल विद्यापीठात गेलो, तसा आज दानवेंना भेटण्यासाठी आलो. तर इथे नाष्टा करायला हजारो मुल आहेत, गेल्या काही वर्षात युवांबद्दल कोणी काही बोलत नाही, युवांमध्ये खुप खदखद आहे. राज्यात अनेक उद्योग येत होते, पण आता उद्योग येत नाहीत. युवांचं मत या सरकारविरोधात आहे. युवांचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. अधिवेशनात आमचे मुद्दे वाटायला पाहिजे, विरोधकांनी मुद्दे मांडले पण गोल गोल उत्तर दिली’.

    तसेच सध्या चर्चा एकच आहे, मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? हा नेता नाराज, तो नेता नाराज. सरकार या मुलांबद्दल कोणतीही चर्चा करायला तयार नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना जेवायला पैसे नाहीत, म्हणून मुलं एक वेळ नाष्ट्यावर काढतात. बीडमध्ये शरद पवारांसाठी भावनिक बॅनर लावले. पण त्यावर नाव लिहायचं धाडस नाही. जो नेता 60 वर्षे एक विचार जपून राहिला, त्याला अप्रत्यक्षपणे ‘रिटायर व्हा’ अस सांगत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.