रोहित पवार यांच्यावर ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादीचा निषेध

लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्यांना रोखण्यासाठी सरकारकडून सुराची कारवाई केली जात आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर आकसाने ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सुडाच्या आणि रोहीत पवार यांना जनतेचा मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ही कारवाई केली जात आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन देण्यात आले.

    सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करून जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी निवेदन दिले. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. शिव – शाहूफुले आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीरकट विरोधी राज्यभरात रान पेटवले आहे.

    राज्यातील सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी युवा शेतकरी महिला यांच्या मुद्द्यावरही ते सरकारला कोंडीत पकडण्यात ते काम करत आहेत. केवळ आपल्या मतदार संघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाई ही आमदार रोहित पवार हे लढवताना दिसत आहेत. राज्यातील युवकांच्या प्रश्नांवर नुकतीच त्यांनी पुढे नागपूर अशी तब्बल आठशे किमीहून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष त्याचबरोबर शेतकरी महिला कामगार यांचे मुद्दे ही आक्रमकपणे मांडले युवा संघर्ष यात्रेच्या समोर रूपाला तर त्यांच्या आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेले प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला. पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाला भूमिका ठामपणे आणि उद्देशीतपणे मांडत आहेत. त्यामुळे घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससे मेरा लावला आहे. यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारू पहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली.

    लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्यांना रोखण्यासाठी सरकारकडून सुराची कारवाई केली जात आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्या विरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक आहे. आमदार रोहित पवार यांनी चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाची यादी पाहिली तर त्यापैकी अनेक जण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटांमध्ये किंवा शिंदे गटांमध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, अनंतराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. शिवाय या बरखास्त संचालक मंडळ विरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही.

    आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्याची चौकशी केली जात असून चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. तसेच नाबार्डच्या अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेल्या गुन्ह्या हा २०१२ साली लिलावामध्ये ५०२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेली आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्ज वाटप करण्यात आमदार रोहित पवार यांचा दूरवरही संबंध नाही. शिवाय २०२९ मध्ये आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही तपासणी बंद करण्यात आली आहे. परंतु केवळ त्रास देण्याचे हेतूने या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणारा जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. या विरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी नागरिकांनी सहभाग दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठविणारे आमदार रोहित पवार हेही शरद पवार यांच्यासोबत मास्टर धर्माच्या विचारासाठी लढत आहेत म्हणूनच त्यांच्यावर आकाशाने कारवाई केली जात आहे. अन्यायकारक या कारवाईचा तीव्र निषेध करत सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही शरण जाणार नाही, कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजपसोबत पळूनही जाणार नाही. कठोर संघर्ष करू लढू आणि जिंकू असा इशाराही राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.