
जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी इंदापूर तहसील कार्यालयावर पुकारलेल्या 'डेरा' आंदोलनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.१८) राष्ट्रवादी कार्यालय ते इंदापूर तहसीलदार कचेरी दरम्यान मोर्चा काढत प्रति आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
इंदापूर : जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी इंदापूर तहसील कार्यालयावर पुकारलेल्या ‘डेरा’ आंदोलनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि.१८) राष्ट्रवादी कार्यालय ते इंदापूर तहसीलदार कचेरी दरम्यान मोर्चा काढत प्रति आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,एमआरपी चे अध्यक्ष संजय सोनवणे, श्रीमंत ढोले,अक्षय भरणे,बाळासाहेब करगळ, नवनाथ रुपनवर,सचिन सपकळ, गजानन गवळी, शहराध्यक्ष बाळा ढवळे,धनंजय बाब्रस, श्रीधर बाब्रस, स्वप्नील राऊत, विठ्ठल ननवरे, दादासाहेब सोनवणे,एमआरपीचे तालुकाध्यक्ष अंगद गायकवाड,आबा देवकाते, संग्राम पाटील,विठ्ठल महाडिक,ॲड. शुभम निंबाळकर, अमर गाडे,अनिकेत वाघ, अतुल शेटे पाटील,सचिन देवकर,दिलीप पाटील, बापू शेंडे,हेमंत पाटील,राजेंद्र देवकाते,अतुल झगडे, प्रकाश शिंदे, रमेश पाटील, सचिन शिरसट,संजय देवकर,गणेश भोंग, प्रशांत गायकवाड,सचिन खामगळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील गौण उत्खनाच्या विषयावर आ. भरणे व तहसीलदार पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते, त्या पार्श्वभूमीवर इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. भरणे यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. आ. दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील २२ दुष्काळी गावांकरता मंजूर केलेल्या पाण्याला खुपसे पाटील यांनी विरोध करत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे म्हणत आंदोलन केले. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे व त्यांच्या कार्यकर्त्यांना पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भिमानगर (ता. माढा) येथे आढवून पुढे जाण्यास मज्जाव केला.
प्रसंगी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे- पाटील यांना १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात बैठकीकरिता निमंत्रण दिले.
प्रशासनावर प्रचंड दबाव असल्याने आमच्या ‘डेरा’ आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली.मला इंदापूरात येऊन जिल्हा परिषद, विधानसभा लढवायची नाही.परंतू, अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे केलेल्या तक्रारीमुळे मी आंदोलन करत असल्याचे खुपसे पाटील यांनी सांगितले.