आमदार रोहित पवार यांच्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा चिपळूणमध्ये घंटा नाद

आमदार रोहित पवार हे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्याय कारक आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन घंटा नाद करीत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र व तहसीलदार कार्यालयासमोर सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

    महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनयाकडून (ईडी) रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे. चौकशीच्या नावाखाली विरोधकांचा होणाऱ्या छळाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चिपळूण पक्षातर्फे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे घंटानाद आंदोलन व चिपळूण तहसीलदार कार्यालयासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर तहसीलदार प्रवीण लोकरे यांना आ. रोहित पवार यांच्या चौकशी विरोधातही निवेदन देण्यात आले.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम, विधानसभा उमेदवार प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, महिला जिल्हाध्यक्षा दिपिका कोतवडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, माजी नगराध्यक्ष सुचय अण्णा रेडीज, अजमल पटेल, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश चिपळूणकर, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष दाभोळकर, हिंदुराव पवार, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पवार, जिल्हा चिटणिस रोहन चौधरी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महमद पाते, ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, महिला तालुकाध्यक्ष राधा शिंदे, शहराध्यक्ष रतन पवार, युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नियाज पाते, महिला शहराध्यक्षा डॉ. रेहमत जबले, कार्याध्यक्षा रुही खेडेकर, अंजली कदम, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, अर्बन बँक माजी चेअरमन सतिश खेडेकर, शहर उपाध्यक्ष संजय तांबडे, भाई गुढेकर, मंदार चिपळूणकर, कादीर मुकादम, माजी नगरसेवक राजेश कदम, फैसल पिलपिले, गुलजार कुरवले, राकेश दाते, फिरोज चौघुले, अन्वर जबले, वासुदेव मेस्त्री, सिद्धिराज पाथरे, दिनेश शिंदे, यतीश कडवईकर, सुधीर जानवलकर, तात्या पवार, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. आमदार रोहित पवार हे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्याय कारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजप सोबत पळूनही जाणार नाही तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम व चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी दिली.