Rupali Patil Thombre's stern warning to Ketki Chitale

योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी देखील एका कार्यक्रमात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळं बाबांना रोषांना सामोरी जावे लागत असून, अनेकांनी बाबांवर टिका केली आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडी आक्रमक झाली आहे.

    मुंबई : भिडे गुरुजींनी महिलांच्या टिकलीवरुन केलेले वादग्रस्त वक्तव्य ताजे असताना, तसेच शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या विधानांची प्रकरणं ताजी असतानाच, आता आता योगगुरु रामदेव बाबांनी महिलांबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं रामदेव बाबांवर (Ramdev Baba) चार बाजुनी टिका होत आहे. महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, तर सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसतात, पण माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरु रामदेव बाबा यांनी केलं आहे.

    राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांसंदर्भात करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी देखील एका कार्यक्रमात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामुळं बाबांना रोषांना सामोरी जावे लागत असून, अनेकांनी बाबांवर टिका केली आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडी आक्रमक झाली असून, योगगुरु रामदेव बाबांनी काळं फासणार असल्याचं पुण्याचील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रुपालाताई ठोंबरी (Rupali Thombare) यांनी म्हटलं आहे.

    जिथे कुठे रामदेव बाबा भेटतील तिथे त्यांना काळं फासणार आहोत, महिलांबद्दल बोलताना त्यांना काहीच वाटले नाही का, असा सवाल देखील रुपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच बाबांना आम्ही काळं फासल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीय, असा इशारा सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून महिलांसंदर्भात करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता रामदेव बाबांनी केलेल्या या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटले आहे.