राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण; स्वत: ट्विट करून दिली माहिती, म्हटलं…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी डेंग्यू झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली असून, यासोबत मेडिकल रिपोर्ट सुद्धा पोस्ट केला आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी डेंग्यू झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली असून, यासोबत मेडिकल रिपोर्ट सुद्धा पोस्ट केला आहे.

    काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. रिपोर्ट आले असून, मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.’

    दरम्यान, जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावं, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच, आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आजारपणातून लवकर बाहेर पडणे, हे शरद पवार गटासाठी महत्त्वाचे आहे.