सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे, इंडिया मधले पक्ष कोठेही जाणार नाहीत – जयंत पाटील

आमचा विरोध मोदींना आहे आणि बीजेपी सोबत जाणार नाही हा आमचा विचार पक्का आहे. इंडिया मधले पक्ष कोठेही जाणार नाहीत.

    राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील : मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या प्रकरणावर अनेक संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले जात आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत आम्ही आहोत, इंडिया मध्ये सुद्धा सहभाग आहे. संविधान वाचवण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमचा विरोध मोदींना आहे आणि बीजेपी सोबत जाणार नाही हा आमचा विचार पक्का आहे. इंडिया मधले पक्ष कोठेही जाणार नाहीत असे जयंत पाटील म्हणाले.

    पुढे ते म्हणाले, आरक्षणाची 50 टक्केची अट रद्द करावी. सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. घटनेत बदल करा आणि आरक्षण द्या, पण सरकारला आरक्षण द्यायचे नाही आहे. जागा वाटपाबाबत आम्ही जाहीर बोलणार नाही. आम्हाला प्रतिनिधित्व हवे आहे मात्र किती असावे हे आता सांगणार नाही. प्रगतिक विकास आघाडी लोकसभेसाठी काही जागांची मागणी करणार आहे असे जयंत पाटील म्हणाले.

    याचदरम्यान जयंत पाटील यांनी राजू पाटील यांच्यावर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, राजू शेट्टी इंडिया सोबत आहेत. एनडीए सोबत जाण्याचा प्रश्नच उरत नाही कारण त्यांनी शेतकरी विरोधी धोरण स्वीकारले आहे. राजू शेट्टी हे प्रागतिक सोबतच राहतील. शेतकरी, कष्टकरी, श्रमिकजनांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रागतिक पक्ष प्रयत्न करणार. प्रागतिक पक्षातील घटक पक्षांचा निवडणुकीत एकमेकांना त्रास होणार नाही असे जयंत पाटील म्हणाले.