कल्याण-डोंबिवलीतील लहान मुलींवरील अत्याचार विरोधात राष्ट्रवादी तीव्र आंदोलन छेडणार – विद्याताई चव्हाण

डोंबिवलीतील प्रल्हाद नारायण पाटील यांनी १० सप्टेंबर २०२२ रोजी सराईत गुंड संदीप माळी व कुंदन माळी यांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडीओ करुन कुणामुळे आत्महत्या करत आहे हे स्पष्ट केले होते त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही असेही विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

    मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये (kalian dombivali) महिला अत्याचार व गुन्हेगारीचे (women crime) प्रमाण वाढले असून, यामागे भाजपच्या (BJP) नेत्याचा हात असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर, राष्ट्रवादीच्यावतीने (NCP) तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला. (NCP Vidya chavan press conference) पोस्कोअंतर्गत कारवाई आणि तडीपारी असताना भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व त्याचा भाऊ कुंदन माळी हे हैदोस घालून दहशत निर्माण करत आहेत, मात्र त्यांना पोलीसही पाठिशी घालत आहे असा थेट आरोपही विद्याताई चव्हाण यांनी केला.

    दरम्यान, डोंबिवलीतील प्रल्हाद नारायण पाटील यांनी १० सप्टेंबर २०२२ रोजी सराईत गुंड संदीप माळी व कुंदन माळी यांच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडीओ करुन कुणामुळे आत्महत्या करत आहे हे स्पष्ट केले होते त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झाला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही असेही विद्याताई चव्हाण म्हणाल्या. सराईत गुन्हेगार संदीप माळी व कुंदन माळी या गुन्हेगारांना शिंदे सरकार पाठीशी घालण्याचे काम करत आहे. लहान शाळकरी मुलींवर अत्याचार केल्यानंतर संदीप माळीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र या गुन्ह्यात त्याला जामीन कसा मिळाला असा सवालही विद्याताई चव्हाण यांनी उपस्थित केला.

    ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ब्रम्हा माळी यांना खंडणीसाठी याच लोकांच्या गुंडांनी मारहाण केली मात्र त्यांना अटक करण्याऐवजी ब्रम्हा माळी यांच्यावरच पोलिसांनी कारवाई केली. याबाबत तक्रार करुनही दखल घेतली गेली नाही. राज्याचे गृहखाते करतेय काय? भाजप पदाधिकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न का करतेय? असा संतप्त सवालही विद्याताई चव्हाण यांनी केला.