
पुणे : ब्ल्यू ब्रिगेड स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित व वेद निर्मिती रियालिटीने पुरस्कृत एनडीए मॅरेथॉन स्पर्धेत अंजनी पांडे, निशु कुमार, अश्विनी देवरे, कृष्णा सिरोठिया, वेदांशी जोशी, अनुभूती चतुर्वेदी, पारसरन हलीझोल, संजय नेगी, प्राधि बुधवार, सीडीटी रितुल, तृप्ती गुप्ता, मोहित यादव, अनुराग कोनकर आणि नरेंद्र पाटील यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अमृमहोत्सवी (७५ वर्षे) स्थापना वर्षा निमित्त ही स्पर्धा आयोजित केली होती.
देशभरातून 13 हजार 500 धावपटूंचा सहभाग
एनडीए येथे पार पडलेल्या शर्यतीत देशभरातून 13 हजार 500 धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत ४२किमी महिला गटात १८ ते ३५ वयोगटात अंजनी पांडेने (०४:१९:५२सेकंद) वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकवला. तर , ३६ ते ४५ वयोगटात अश्विनी देवरे(०४:०६:१०सेकंद) हिने अव्वल क्रमांक पटकावला. ४२किमी पुरुष १८ ते ३५ वयोगटात निशू कुमार(०२:५०:२३सेकंद) याने तर ३६ ते ४५ वयोगटात कृष्णा सिरोठिया(०३:२३:४८सेकंद) यांनी पहिला क्रमांक पटकावला. २१किमी महिला १८ ते ३५ वयोगटात वेदांशी जोशी(०१:४१:४९सेकंद)ने तर, ३६ ते ४५ वयोगटात अनुभूती चतुर्वेदी(०१:४४:४९सेकंद) वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले. २१किमी पुरुष १८ ते ३५ वयोगटात पारसरन हलीझोलने विजेतेपद मिळवले. ३६ ते ४५ वयोगटात संजय नेगीने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा संक्षिप्त निकाल: ४२किमी महिला गट :
१.अंजनी पांडे २ रजनी सिंग ३ रविता रामविलास राजभर . ३६ ते ४५ वयोगट: १अश्विनी देवरे २.आरती अग्रवाल.
४२ किमी पुरुष गट :१८ ते ३५ वयोगट : १. निशू कुमार, २.श्रीकांता महातो, ३गणेश खोमणे.३६ ते ४५ वयोगट: १. कृष्णा सिरोठिया २ लेफ्टनंट कर्नल स्वरूप सिंग कुणाल ३.वसंत पंडिता.
२१किमी महिला गट:
१८ ते ३५ वयोगट: १.वेदांशी जोशी २ भावनीत कौर ३ प्रियांका पाईकराव. ३६ ते ४५ वयोगट: १.अनुभूती चतुर्वेदी २ नेत्रा ३ अंजू चौधरी. २१किमी पुरुष गट:
१८ ते ३५ वयोगट: १.पारसरन हलीझोल २ सीडीटी निखिल चंद ३ सीडीटी प्रिन्स बमल. ३६ ते ४५ वयोगट: १.संजय नेगी २ अंकुश गुप्ता ३ योगेश सानप.