ndrf mockdrill

महाडमध्ये (Mahad) दाखल झालेल्या एनडीआरएफच्या (NDRF) टीमकडून आज दादली पूल परिसरात सावित्री नदी पात्रात बोटीने पात्र पार करण्याचा सराव (NDRF Mock Drill) करण्यात आला.

    महाड :आपत्तीकाळात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी महाडमध्ये (Mahad) दाखल झालेल्या एनडीआरएफच्या (NDRF) टीमकडून आज दादली पूल परिसरात सावित्री नदी पात्रात बोटीने पात्र पार करण्याचा सराव (NDRF Mock Drill) करण्यात आला. यावेळी एनडीआरएफच्या टीमसोबत सिस्केपचे सदस्य, पोलीस दलातील कर्मचारी व पत्रकार या मॉकड्रील मध्ये सहभागी झाले होते.

    गेल्या वर्षी २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात आलेल्या महापूरात सावित्री नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली. दादली पुलावरून ८ ते १० फूट पाणी वाहात होते. यावर्षी अशी परिस्थिती उद्भवली आणि सावित्री नदीच्या दोन्ही बाजूच्या तीरावरून आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना पात्र पार करून आणावे लागले तर त्याची पुर्वतयारी करण्यासाठी एनडीआरएफची टीम दोन बोटी घेऊन सावित्री पात्रात उतरली होती. त्यांनी दादली पूल ते राजाचा पायरा या परिसरात बोटीने फेरफटका मारून नदी पात्र पार करण्याचा सराव केला. एनडीआरएफच्या टीमचे प्रमुख बी महेश यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेले हे आपत्ती काळातील प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.